राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना खासदारार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता यापूर्वी सुद्धा हनुमान चालीस मातोश्रीवर येऊन वाचणार या हट्टापायी त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली अशातच आता पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी राणा यांनी उद्धव ठाकरेंना भाईजान म्हणत खिल्ली उडवली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका करत डिवचले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असे संबोधले पाहिजे, असे विधान त्यांनी केले.
नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरेंच्या नावात आता बदल झालेला आहे. त्यांचे आता भाईजान उद्धव ठाकरे असे नाव झालेल आहे. ३३ महिने मुख्यमंत्रीपदावर बसलेले औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही. संभाजीनगरातील दंगलीच्या बातम्या पाहून वेदना झाल्याचे उद्धव ठाकरे सभेत म्हणाले, त्यावरूनही राणा यांनी खडे बोल सुनावले. ३३ महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला. तेव्हा उद्धव ठाकरेंना वेदना का झाल्या नाहीत? तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्याचा कारभार चालवला, सरकार चालवले ते काय पंतप्रधानांवर टीका करणार. पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम आहेत, असा इशाराही राणा यांनी दिला.
येत्या हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून सामूहिक हनुमान चालिसा पठनाचा भव्य कार्यक्रम आयोजित होणार आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील मागील हनुमान जयंतीची आठवण नवनीत राणा यांनी काढली. हनुमान चालीसा पठण करायचे म्हटल्यावर डोक्यात विचार येते, की बाबा पुन्हा जेलमध्ये तर टाकणार तर नाही ना? मागील वर्षी हनुमान चालीसा नाव घेतल्यानंतर ३३महिन्याच्या सरकारने मला जेलमध्ये टाकण्यात आले होते, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.