Latest Marathi News

BREAKING NEWS

गुळपोळीच्या श्री भैरवनाथ यात्रेला गुरुवार पासून
प्रारंभ ; शुध्द चैत्र पोर्णिमेला श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेला सुरवात

0

बार्शी |

तालुक्यातील गुळपोळी येथे एप्रिल महिन्यात म्हणजे शुध्द चैत्र पोर्णिमेला अर्थात हनुमान जयंतीला गुळपोळी येथे श्री भैरवनाथ (जोगेश्वरी) यात्रेला गुरुवार पासून प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन आणि महाराष्ट्रात तीर्थक्षत्र म्हणून गुळपोळी या गावाला ओळखले जाते. श्री भैरवनाथाचा आवतार  महादेवाचा आहे. बऱ्याच काळापासून गुळपोळीत यात्रा भरली जाते. अतिशय सुंदर पध्दतीने यात्रा पार पाडली जाते दर रविवारी सायंकाळी भैरवनाथ मंदिरात महाआरती केली जाते. त्याच बरोबर महाप्रसाद वाटप असतो.

चैत्र शुध्द व्द|हाशीला देव गावा बाहेर नऊ दिवस घटस्थापना केली जाते. चैत्र पोर्णिमेला दिवशी मध्य रात्रि पासून श्री भैरवनाथ देवाला पुरण पोळीचा नैवद्य देऊन त्यावेळेपासून यात्रेला प्रांरभ होतो. सकाळी 9 वाजता गुळाच्या शेरणी देवास निहिण्यास सुरुवात होते. ते दिवसभर चालू असतात. गाजत भैरवनाथची काठी घेऊन शेरण्या निहिल्या जातात. सायंकाळी आरती भैरवनाथाची केली जाते. त्यावेळी गावातील भाविक ग्रामस्थ बाहेर गांवाहुन आलेले लोक आरतीसाठी उपस्थित मोठया संख्येने  भैरवनाथ  मंदिरात असतात. अनेक दिवसांपासून दररोज आरती श्री भैरवनाथ मंदिरात केली जाते. सध्या दररोज मंदिरात महाप्रसाद वाटप केला जातो. प्रसाद घेण्यासाठी मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी मानाची काठी मानकरी मालवंडीहुन घेऊन भाविक गुळपोळी येतात. आणि कोरफळे गावातील भाविकाना आबीलचा गाडा किवा माठ दिला जातो.

ते शुध्दा भक्ति भावाने गुळपोळीच्या भैरवनाथ (जोगेश्वरी ) देवाच्या दर्शनाला लोक येतात. तिसऱ्या दिवशी देवाचा छबिना काढून मिरवणूक काढण्यात येते. छबिन्यात व छबीण्यापुढे    पारंपारिक लोककलेची वेशभूषा करुन कार्यक्रम चांगल्या प्रकारे केला जातो. त्यामध्ये राम लक्ष्मण सीता, हनुमंत ,रामायण, महाभारत ,पांडव इत्यादि कलेच्या स्वरुपात कलाकाराने आपली वेशभूषा सादर केली जाते. त्यामध्ये तरुण वर्ग सहभागी असून सर्व वर्गातून सहभाग घेतला जातो. यात्रेचा सांगता आश्या प्रकारे श्री भैरवनाथ  यात्रा गुळपोळी मध्ये गुण्या गोविंदाने साजरी केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.