मुंबई : कोरोना माहामारीने जगात थैमान घातल्यानंतर जगातील जवळ जवळ सर्व शहरांतील विमान सेवा पूर्णपणे ठप्प आहे. कोरोनाच्या विषाणूवर जगात अनेक ठिकाणी संशोधन होत आहे. नवनवीन बाबी पुढे येत आहेत. अशाच प्रकारचा एक इंटरेस्टिंग प्रयोग युरोपातील फिनलँड येथील हेससीन्सकी येथे सुरू आहे. येथे कुत्र्यांद्वारे कोरोनाची टेस्ट केली जाते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या टेस्टची ऍक्युरसी 100% आहे.
नेमका कसा आहे हा प्रयोग ?
युरोप खंडातील हेलसीन्सकी हे एक मोठे विमानतळ आहे. या शहरामध्ये आत्ता 16 कुत्र्यांवरती या प्रयोगाची चाचणी सुरू आहे. त्यातील 4 कुत्रे हे एअरपोर्ट वर प्रायोगिक तत्वावर एव्हाना देऊ केले आहेत. या प्रयोगात विमानातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या हाताच्या त्वचेला कापडाने किंवा टीशूने पुसले जाते, ते कापड एका भांड्यात ठेऊन कुत्र्याला वास घेण्यासाठी दिले जाते. वास घेतल्यानंतर कुत्रा इशारा करतो, जसे की भुंकने, पाय आपटने किंवा जमिनीवर लोळणे. यावरून तो व्यक्ती बाधित असल्याचे समजते. विशेष म्हणजे इतर कोणत्याही टेस्ट पेक्षा कुत्र्याने केलेली ही टेस्ट जास्त अचूक निघते असा दावा या प्रयोगाद्वारे करण्यात आला आहे.
याचा कुत्र्याला कितपत धोका ?
जमेची बाजू अशी की यातून कुत्र्याला कोणताही धोका होत नाही, तसेच हा विषाणू कुत्र्याद्वारे कोणाला बाधितदेखील करू शकत नाही. माणसाच्या शरीरात विषाणूचे वाहक म्हणून कार्य करणारे रिसेप्टर्स असतात. ज्यांना विषाणू चिटकतो आणि शरीरात प्रसार करतो. हे रिसेप्टर्स लहान मुलांच्या शरीरात कमी असतात. मात्र कुत्र्यांच्या शरीरात हे रिसेप्टर्सच नसल्यामुळे कुत्रा या विषाणूने बाधितही होत नाही आणि या विषाणूचा वाहक देखील होत नाही.
कुत्र्याला कसे समजते ?
जेंव्हा एखादा व्यक्ती कोरोनामुळे बाधित होतो तेंव्हा त्याच्या त्वचेवरील घामामध्ये विशिष्ठ प्रकारचे केमिकल रिलीज होत असावे ज्याचा वास कुत्र्याला येतो. मात्र ते केमिकल कोणते आहे याचा अद्याप शास्त्रज्ञांना शोध घेता आलेला नाही.
हा प्रयोग जर यशस्वी झाला तर कोरोना लढाईतील हा एक क्रांतिकारक शोध असेल. कारण त्या व्यक्तीच्या त्वचेवरून कापड फिरवून कुत्रा वास घेईपर्यंत फक्त एक मिनिटांचा वेळ जातो. ज्यामुळे मोठमोठ्या विमानतळावर याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. वेळ आणि संसाधने या दोन्हींची बचत होईल. कित्येक लोक ज्यांना कोरोनाची लक्षणेच दिसत नाहीत. अशा लोकांना वाहक होण्यापासून आपण पूर्णपणे थांबवू शकू.