Latest Marathi News

BREAKING NEWS

बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर

0

मुंबई : गेले कित्येक दिवस देशामध्ये बिहार निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्रातील कंगना राणावत आणि शिवसेनेचा संघर्ष असेल किंवा सुशांतसिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरण असेल या सर्वांची पार्श्वभूमी कुठे ना कुठे बिहार निवडणुकांडेच बोट करते. असा आरोप सातत्याने देशातील विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे.

अशातच आता बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 243 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे, 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर या तीन तारखांना बिहारमध्ये निवडणूका पार पडणार आहेत.

संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या बिहार निवडणूकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे बिहार नेमके कोणाचे हे 10 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवणूक प्रचाराची धुरा ठेवण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.