Latest Marathi News

BREAKING NEWS

नितीन देसाईंचा शवविच्छेदन अहवाल समोर, मृत्यूचे कारण स्पष्ट

0

2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक बातमीने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. कर्जत येथील त्यांच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शन करणाऱ्या देसाईंनी अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या या अचानक आणि टोकाच्या निर्णयाने सर्वांवर शोककळा पसरली आहे.

आता त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

हेही वाचा :सुप्रसिद्ध निसर्गकवी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ना.धों. महानोर यांचे निधन

हेही वाचा :“संभाजी भिडे जर फडणवीसांचे गुरुजी असतील तर…”,भास्कर जाधवांचं थेट वक्तव्य

नितीन चंद्रकांत देसाई यांचे जेजे रुग्णालयातील चार डॉक्टरांच्या गटाने बुधवारी शवविच्छेदन केले. रायगड पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक निकालावरून मृत्यूचे कारण फाशीमुळे दिसून येत आहे. चार डॉक्टरांच्या पथकाने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे शवविच्छेदन केल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली असून, प्राथमिक तपासात फाशीमुळेच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.