Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शी येथील भाग्यकांता प्रतिष्ठान संचलित शब्दरंग हे दालन रसिकांसाठी खुले, राज्याच्या सिनेनाट्य जगतामधील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती

0

बार्शी येथील भाग्यकांता संचलित शब्दरंग पुस्तकं काॅफी गप्पा आणि बरच काही या अनोख्या दालनाचा शुभारंभ रविवार १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते विजू माने , सिने नाट्य अभिनेते संजय क्षेमकल्याणी, लेखक,निर्माते हेमंत एदलाबादकर, ठाण्याचे तहसीलदार विशाल इंदूलकर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी डिजिटल मिडीया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने , निर्माते दिपक नलावडे, नागेश अक्कलकोटे , साहित्यिक रामचंद्र इकारे, संस्थापक मुरलीधर चव्हाण, संचालक रोहन नलावडे, भाग्यकांता प्रतिष्ठानच्या कार्यकारी अध्यक्षा सुनीता गाडेकर, अभिनेते अभय चव्हाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शब्दरंग या स्टुडिओचे अनावरण दिग्दर्शक लेखक विजू माने यांची मुलाखत घेऊन करण्यात आले.

शब्दरंग हे बार्शीतील साहित्य रसिकांसाठी व्यक्त होण्यासाठीचं व्यासपीठ असेल, विविध प्रकारच्या व्यवसायिक कार्यक्रम घेण्यासाठीचं ठिकाण असेल ,वैचारिक बैठक अनुभवण्याचं ठिकाण असेल, त्याच बरोबर नैराश्यातून बाहेर काढण्यासाठीचे समूपदेशन केंद्रही असेल अशी माहिती यावेळी अमित इंगोले यांनी दिलील. बार्शीकरांसाठी ‘शब्दरंग’ म्हणजे आनंदाचे माहेरघर ठरणार यात शंका नाही, अशा शब्दांत कौतुक करत अनेक मान्यवरांनी शब्दरंग साठी शुभेच्छा व्यक्त केल्या. शब्दरंग चे वार्षिक सभासदत्व स्विकारून शब्दरंग परिवारात सामील होण्यासाठी भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानने आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.