मुंबई । दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर यांच्याशी जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे कोठडीत होते मात्र आता राष्ट्रवादीसाठी दिलासादायक वृत्त काल समोर आले होते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव गेल्या शुक्रवारी जामीन मंजूर केला. सोमवारी सर्व न्यायिक प्रक्रिया पार पडल्यानंतर ते सायंकाळी बाहेर आले. या सुटकेनंतर त्यांच्या कुर्ला येथील मतदार संघात कार्यकर्त्यांनी फेकते फोडून निर्णयाचे स्वागत केले.
मलिक यांच्या सुटकेच्या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, संजय तटकरे, नरेंद्र राणे उपस्थित होते. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना ईडीने अटक केली होती.सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्या सुटकेसंदर्भातील कागदपत्रे सत्र न्यायालयात देऊन तिथून उचित औपचारिक आदेश प्राप्त करून घेणे गरजेचे होते.
मात्र, सोमवारी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुटीवर असल्यामुळे मलिक यांच्या वकिलांनी विशेष न्यायमूर्ती ए. एम. पाटील यांच्यासमोर याचिका सादर केली. त्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. सदर कागदपत्रे घेऊन मलिक यांचे वकील आर्थर रोड येथे गेले. मलिक गेल्या वर्षभरापासून क्रिटी केअर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, त्यांचा ताबा आर्थर रोड प्रशासनाकडे आहे. आर्थर रोड प्रशासनाला ही कागदपत्रे सादर केल्यानंतर मलिक यांच्या रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या पोलिसांना हटवत त्यांची मुक्तता करण्यात आली.
७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक न.पा.शाळा नं पाच मध्ये ध्वजारोहण संपन्न.