बार्शी- प्रतिनिधी आज सकाळी आठ वाजता लोकमान्य टिळक न पा शाळा नं पाच मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रा. प्रकाश मनगिरे, मुरलीधर चव्हाण, गणेश चव्हाण, अमोल पवार,पत्रकार शिंगाडे आदी उपस्थित होते..
मुरलीधर चव्हाण म्हणाले, माझं प्राथमिक शिक्षण या शाळेत झालं याचा अभिमान वाटतो.या शाळेतून विद्यार्थी वर्गातून सगळे विद्यार्थी आदर्शवत नागरिक उदयास येतील असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी झेंडा वंदना नंतर विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वितरण करण्यात आले. मुख्याध्यापिका गवळी मॅडम, गिराम मॅडम, सोनटक्के सर यांच्यासह बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होते. आभार सोनटक्के सरांनी व्यक्त केले.