महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा होणार? लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार का? विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, या बैठकीनंतर काँग्रेस नेते पत्रकार परिषदेला सामोरे गेले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली.
हेही वाचा : मनसे टेलिकॉम सेनेच्या आंदोलनापुढे फोन-पे ची माघार आता फोन-पे स्पीकरच्या सूचना मराठीत मिळणार !!
हेही वाचा : करमचंद गांधी हे महात्मा गांधी यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहे !
या बैठकीत काय चर्चा झाली? याबद्दल सांगताना नाना पटोले म्हणाले, १५ ऑगस्टनंतर किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ची (INDIA) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही आज (२८ जुलै) शरद पवार यांना भेटलो. महाविकास आघाडी या बैठकीचं आयोजन करेल.
हेही वाचा : पूराच्या पाण्यात झाडावर अडकली व्यक्ती, तब्बल ८ तासाने रेस्क्यू
नाना पटोले म्हणाले, पुढच्या शनिवारी सकाळी ११ वाजता ‘इंडिया’च्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही पुन्हा एक बैठक घेणार आहोत. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येतील, वेगवेगळ्या राज्यांमधील पक्षांचे नेते येतील. या बैठकीसाठी १०० पेक्षा जास्त मोठमोठे नेते मुंबईत येतील. असा अंदाज आहे.