Latest Marathi News

BREAKING NEWS

“राहुल कुल भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष म्हणून संजय राऊत संतापले”

0

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी सरकारने आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट दिली आहे. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार म्हणजे क्लीन चिट देणारा कारखाना आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, भाजपा आणि राष्ट्रवादीतील इतर नेत्यांवरही राऊतांनी निशाणा साधला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरलं.

हेही वाचा : “शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीतिल नाना पटोले यांनी ठळक मुद्दे उघड केले”

हेही वाचा : मनसे टेलिकॉम सेनेच्या आंदोलनापुढे फोन-पे ची माघार आता फोन-पे स्पीकरच्या सूचना मराठीत मिळणार !!

हेही वाचा : करमचंद गांधी हे महात्मा गांधी यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहे !

“दौंड न्यायालयाने तक्रारदार नामदेव ताकवणे यांच्या तक्रारीला महत्त्व देऊन कारखान्याचे चेअरमन, लेखापरिक्षक यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यात काही तथ्य असल्याशिवाय न्यायालय आदेश देणार नाहीत. या कारखान्यातील त्रुटी, घोटाळ्यांची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांना मी दिली आहे.भ्रष्टाचार करणारा त्यांच्या पक्षाचा माणूस आहे, त्यामुळे आपण त्याला वाचवलं पाहिजे, ही गृहमंत्र्यांची भूमिका आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.