Latest Marathi News

BREAKING NEWS

मणिपूर जळतेय, ते नरेंद्र मोदी विसरलेत, राहुल गांधींनी साधला निशाणा

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सभागृहात केलेल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आता हाच मुद्धा उओईस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. माननीय पंतप्रधान यांनीजवळपास २ तास १२ मिनिटांचं भाषण केलंय यामध्ये मणिपूर हिंसाचारच्या विषयावर फक्त २ मिनिटं बोलले. नरेंद्र मोदी मणिपूरबाबात बोलताना हसत होते, दोन तास चेष्टा करत होते, अशी टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

मणिपूरचं विभाजन झालं आहे. नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. ते थांबवायचं नाहीय. मणिपूर जळतेय, ते नरेंद्र मोदी विसरलेत, अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. भाजपाने मणिपूरचे दोन तुकडे केले. तसेच भारतीय लष्कराला सांगितल्यास मणिपूरमधील सुरु असलेला हिंसाचार ते २ दिवसात थांबवू शकतात. मणिपूर २ दिवसांत शांत होईल, पण त्यांना मणिपूरमधीलआग विझवायची नाहीए, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, मी गेल्या १९ वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत पाहिले नाही. प्रत्यक्ष दौऱ्यावेळी मैतेई आणि कुकी समाजातील संघर्ष किती विकोपाला गेला आहे हे मी अनुभवलं आहे. मणिपूर हे एक राज्य राहिलेले नाही. भाजपाने त्याचे तुकडे केले आहेत. मणिपूरमध्ये एवढं सगळं घडत असतानाही पंतप्रधान हसत बोलत होते. ते मणिपूरला जाऊ शकत नाही, याची काही कारणं आहेत. पण त्यांनी किमान मणिपूरबद्दल बोलायला हवं, एवढी आमची अपेक्षा होती, अशी टिप्पणी राहुल यांनी केली.

प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी,पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

नाशिक-पुणे मार्गावर काँग्रेस आमदार राजेश राठोड यांच्या अंगावर ट्रक घालून मारण्याचा प्रयत्न

Leave A Reply

Your email address will not be published.