Latest Marathi News

BREAKING NEWS

ऍम्ब्युलन्स जात नाही म्हणल्यावर,घरातून पाठीवर नेले कोरोनाग्रस्त आजीला..!!

0

पुणे: जगात कोरोनाने थैमान घातले आणि माणसाच्या मनात कोरोनाच्या भीतीने..!! कोरोनाग्रस्तांकडे वेगळ्या नजरेने बघण्याचा, त्यांना अक्षरशः वाळीत टाकण्याचा देखील प्रकार झाला. पण एक वर्ग होता ज्याने कोरोनाला आपल्या आत्मविश्वासाच्या पाठीवर केंव्हाच बांधला होता. तो म्हणजे डॉक्टर्स, कर्मचारी आणि नर्सेस..!! अशाच एका निराधार आजींना आपल्या पाठीवर बांधून नेणाऱ्या निलेश पवारने कोरोनाला आपल्या पाठीवर बांधला आणि सांगितलं की तू काही आमच्या हिमतीच्या पुढे नाही जाऊ शकत.

पुणे पर्वती जनता वसाहत येथील एक वयोवृद्ध महिला घरात तापाने फणफणलेली आहे व ती कोरोना विषाणू ने पॉझिटिव्ह आहे असे मनपा आरोग्य विभागाला समजले परंतु डोंगरावर बारीक गल्ली तुन त्या वृद्धेच्या घरापर्यंत स्ट्रेचर वर घेऊन जाणे आणि पुन्हा सुरक्षित घेऊन येणे हे अत्यंत जोखमीचे काम हे कसे पूर्ण करायचे हा प्रश्न प्रशासना समोर उभा ठाकला होता. ही गोष्ट नागरिकांकडून निलेश पवार याला समजली.

गप्प बसने ज्याच्या स्वभावात नाही. त्या कोविड योद्ध्यांने कसलाही मागचा पुढचा विचार न करता स्वतः मिळेल ते पी पी ई किट घातले आणि उंच डोंगरावर जाऊन त्या”कोरोना पॉझिटिव्ह” आज्जीला स्वतःच्या पाठीवर बसवून खाली घेऊन आला. ही महिला पॉझिटिव्ह आहे हे माहीत असताना तिच्या मुळे मला लागण होऊ शकते याची माहिती असताना सुद्धा अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याच्या मूळ स्वभावामुळे निलेश हा धोका सुद्धा पत्करण्यास तयार झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.