Latest Marathi News

BREAKING NEWS

महाविकास आघाडी सरकारमधील आणखीन एका मंत्र्याला कोरोनाची लागण

0

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची बाधा झाल असल्याचं समोर आलं आहे. शेख यांनी स्वतः ट्विटवर ही माहिती दिली आहे.

मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला आयसोलेट करुन घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी” अशी विनंतीही अस्लम शेख यांनी केली. माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे. असेही शेख यांनी सांगितले आहे.

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अस्लम शेख हे राज्य मंत्री मंडळात वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. कोरोना काळात अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक कोरोना हॉटस्पॉट भागात पाहणी दौरे केले आहेत.

जगभरामध्ये जवळपास १ कोटी 46 लाखांच्यावर लोक कोरोनामुळे बाधित झाले आहेत. भारतामध्ये देखील रुग्णसंख्या १० लाखांच्यावर पोहचली आहे. तर महाराष्ट्रामध्ये तीन लाख लोक कोरोना बाधित झाले आहेत.

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. हे तिन्ही मंत्री कोरोनावर मात करत आपल्या घरी परतले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.