लायन्स क्लब चेतना च्या वतीने कर्मवीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चारे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलताना या विषयावर तज्ञ डॉ. मीरा विजय गोदेपुरे यांनी मार्गदर्शन केले, यामध्ये किशोरवयीन मुलींना येणाऱ्या समस्या त्यांचे उपाय त्याचप्रमाणे किशोर वयात होणारे शारीरिक व मानसिक बदल या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले व मुलींच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रमाणे विद्यालयीन मुलांचे वाढदिवस साजरे करण्यात आले वृक्षारोपणही करण्यात आले व यावेळी आपल्या क्लब मेंबर वृषाली होनराव यांनी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राखी मेकिंग व आर्ट अँड क्राफ्टचे वर्क शॉप घेतले. अशा विविध उपक्रमांमुळे मुलांच्या कलागुणांना वाव व त्यांमध्ये उत्साह निर्माण होण्याची क्षमता वाढते तसेच किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केल्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात असे मत विद्यालयाचे प्राचार्य अशोक मुंढे यांनी व्यक्त केले, व याच प्रमाणे असे उपक्रम घेऊन लायन्स क्लब बार्शी चेतना समाजासाठी अतिशय उत्तम कार्य करत आहेत असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या वेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष गायत्री बंडेवार, उपाध्यक्ष जयश्री कदम, खजिनदार वर्षा साखरे, रीजन चेअरमन बापूसाहेब कदम व सदस्य रुशाली होनराव, प्रियंका माढेकर, मधुरा पाटील, प्रणाली गांधी, डॉ. मिरा विजय गोदेपुरे याचप्रमाणे चारे येथील विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते, या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला, या विविध उपक्रमाद्वारे सुमारे 300 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.