Latest Marathi News

BREAKING NEWS

दादा व ताईचे ‘पावरफुल’ रक्षाबंधन ; सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव

0

राज्यभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, आजही अनेक भाऊ आणि बहिणी राखीपोर्णिमेचा सण तितक्याच उत्साहाने साजरा करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज रक्षाबंधन सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना राखी बांधलेले फोटो व्हायरल होत आहेत.

राजकीय क्षेत्रातील या ‘दादा’ आणि ‘ताई’चा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. याशिवाय, अजित दादा पारंपरिक पद्धतीची टोपी घालून सुप्रिया यांच्याकडून राखी बांधून घेताना दिसतायंत. ‘आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा’, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.