बार्शी-10 राज्यातील पतसंस्थांबाबतील काढलेले अंशदानाचे परिपत्रक त्वरित रद्द करण्या संदर्भात निवेदन सहकार भारती बार्शी यांच्याकडून सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करण्यात आले. सदरचे निवेदन सहायक सहकारी अधिकारी मा.सचिन महाडिक यांनी स्वीकारले
सदर प्रसंगी सहकार भारतीचे जिल्हा प्रतिनिधी तथा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक मुरलीधर चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कांबळे,सहकार भारती बार्शी तालुका अध्यक्ष अमित इंगोले, सचिव विजय शिखरे,मेजर दत्तात्रय मोरे, रविंद्र जाधव, गणेश वाघमारे, मंगेश बारंगुळे आदी उपस्थित होते.
सदरचे निवेदन संबंधित वरिष्ठ कार्यालयात पाठवू असं आश्वासन महाडिक यांनी दिले.
अंशदान संदर्भात शासनाचे सविस्तर मार्गदर्शन नसल्याचे अनेक संस्था संभ्रमात असल्याचे चित्र आहे.