Latest Marathi News

BREAKING NEWS

विधानसभेत सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील कुजबुजीमुळे बच्चू कडू संतापले; म्हणाले, “जुगाराच्या अड्ड्यावर…”

0

आमदार बच्चू कडू यांचा संताप आज (4 ऑगस्ट) विधानसभेच्या अधिवेशनात पाहायला मिळाला. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते. बच्चू कडू विधानसभेत बोलत असताना शिवसेनेच्या ठाकरे गटातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते गप्पा मारत होते. त्यांच्या कुजबुजीमुळे बच्चू कडू यांना बोलताना अडथळा येत होता. अखेर बच्चू कडू यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर ही नाराजी विधानसभा अध्यक्षांपुढे व्यक्त केली. तरीदेखील आमदारांमधील गप्पा सुरूच होत्या. अखेर, बच्चू कडू यांनी स्वतः या आमदारांना सुनावलं. तसेच तुम्ही सभागृहात बसलेले आहात की जुगाराच्या अड्ड्यावर गप्पा मारताय? असा प्रश्नही विचारला.

हेही वाचा :एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे हे…”

हेही वाचा :प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांना औरंगजेबच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले; म्हणाले, “औरंगजेब हा तुमचा आदर्श होऊ शकत नाही पण…”

आमदार बच्चू कडू म्हणाले, अध्यक्ष महोदय, मी बोलत असतांना काही लोक गप्पा मारत आहेत. हे सभागृहात बसले आहेत की सभागृहाच्या बाहेर? जुगार अड्ड्यावर बसले आहेत की काय? आदित्य ठाकरे, जाधव साहेब, वायकर हे आपसात बोलत आहेत. अध्यक्ष महोदय, यांना सभागृहाचे नियम सांगा. यावर तालिका अध्यक्षांनी या सर्व आमदारांना शांत राहण्यास सांगितलं. तसेच ते म्हणाले, बच्चू कडूंना बोलत असताना व्यत्यय येतोय. त्यामुळे शांत राहा. तरीदेखील हे आमदार बोलत होते.

हेही वाचा :नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण, पाच जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल

तालिका अध्यक्षांनी बजावल्यानंतरही आमदारांचा संवाद सुरूच होता. त्यामुळे बच्चू कडू अधिकच संतापले. अध्यक्ष महोदयांनी सांगूनही हे लोक बोलत आहेत, असे ते म्हणाले. अध्यक्ष महोदय, तुमचा तुमचा प्रभाव पडत नाही. यांना सांगा आपसात बोलू नका. तुम्ही काय जुगार अड्ड्यावर बसलाय का? मीसुद्धा चार वेळा आमदार म्हणून निवडून आलोय.

Leave A Reply

Your email address will not be published.