Latest Marathi News

BREAKING NEWS

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

0

बार्शी (प्र): शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीस सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मयूर धर्मराज शिंदे वय २३ रा.पारडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद या युवकावर बार्शी शहर पोलिस स्टेशन मध्ये दिनांक २ जून २०२३ रोजी भा.द.वि. कलम ३६३,३६६,३७६,(२)(N) (i) व POCSO अॅक्ट 4,8,१२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर या आरोपीस पोलिस कोठडी व न्यायलयीन कोठडी मिळाली होती या प्रकरणात आरोपीचे वकिल अॅड॰ नंदकुमार सुतार अॅड. सुदर्शन सोनवणे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी आरोपीची सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने अॅड.श्रीमती कदम यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.