Latest Marathi News

BREAKING NEWS

मला अजित पवारांची मानसिकता महाराष्ट्राला सांगायची आहे-जितेंद्र आव्हाड

0

अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे.तसेच आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, अशा आशयाचं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलं आहे. अजित पवारांच्या या कृत्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा >>पुन्हा शिवसेना फुट पॅटर्नची पुनरावृत्ती होणार ! साहेब विरुद्ध दादा संघर्ष वाढणार !

हे ही वाचा >>“बंडाच्या दोन दिवस आधीच अजित पवारांची मोठी खेळी.”

मला अजित पवारांची मानसिकता महाराष्ट्राला सांगायची आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी टीकास्र सोडलं आहे. “आपण जी राक्षसी महत्त्वकांक्षा म्हणतो, ती महाराष्ट्राला सांगायची आहे. त्या काकाला (शरद पवार) पूर्णपणे गिळून टाकायचं आहे, ही राक्षसी महत्त्वकांक्षा त्यांनी स्वत: महाराष्ट्रापुढे उघड केली आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.