Latest Marathi News

BREAKING NEWS

लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला? सरकार म्हणतंय माहीत नाही

0

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, यावेळी विरोधकांकडून लेखी पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत आहेत. कोरोना संकट काळात आणि लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांवर बरेच संकट उभे राहिले, सरकारला या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, विरोधी पक्षातील काही खासदारांनी स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूची माहिती मागविली, ज्यात सरकारने असे सांगितले की त्यांच्याकडे असा डेटा नाही.

लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांचा आकडा तपासण्यात सरकारने चूक केली आहे का? लॉकडाऊन दरम्यान किती मजूर मरण पावले याविषयी शासनाकडे आकडेवारी आहे की नाही?. याशिवाय सरकारने सर्व रेशनकार्डधारकांना विनामूल्य रेशन दिले आहे का? आणि दिले असल्यास त्याबाबत माहिती द्या.

याशिवाय कोरोना संकटाच्या वेळी सरकारने घेतलेल्या निर्णयांविषयी प्रश्न विचारण्यात आले. केंद्र सरकारच्या वतीने मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लेखी उत्तर देऊन म्हटले आहे की देश म्हणून केंद्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थेने कोरोनाविरूद्ध लढा दिला आहे. मृतांच्या संख्येबाबत सरकार सांगते की त्यांच्याकडे असा कोणताही डेटा नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.