Latest Marathi News

BREAKING NEWS

कोणत्या महिन्यात येत आहे रशियाची लस, जाणून घ्या किती प्रभावी आहे..!!

0

मुंबई : भलेही जगातील अनेक तज्ञ या लसीवर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत, तरीही रशियाला मात्र आपल्या लसीवर कमालीचा विश्वास आहे. त्यांनी उत्पादनाचा पहिला टप्पा पूर्ण देखील केलेला आहे.रायटर्स या न्यूज एजन्सीच्या मते, या महिनाअखेर पर्यंत रुस मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करणार आहे. ऑक्टोबर मध्ये सर्व देशात लसीकरण करण्याचे अभियान राबवणार आहे.

रुसमधील गमलेया इन्स्टिट्यूटने ही वॅक्सिन बनवली आहे, ज्याचे नाव स्पुतिनिक V असे आहे. या इन्स्टिट्यूटने डिसेंबर पर्यंत ५० लाख डोस बनवणार असल्याचा दावा केला आहे. कित्येक देशांच्या या लसीसाठी ऑर्डर्सदेखील मिळाल्याचे सांगितले आहे.

असे असले तरी, एका रिपोर्टनुसार या लसीच्या टेस्टिंगचे तीन टप्पे पूर्ण झालेलेच नाहीत. तज्ञांच्या मते तीन टप्पे पूर्ण झाल्याशिवाय असा दावा करणं योग्य नाही. या रुसी वॅक्सिनचा तिसरा टप्पा ब्राझिल, मॅक्सिको, सउदी अरब आणि संयुक्त अरब अमीरात येथे करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

रशियातील न्यूज एजन्सी ताँसच्या मते, या लसीचे उत्पादन करणाऱ्या वैज्ञानिकाने असा दावा केला आहे की, ही लस दोन वर्षे शरीराचा कोव्हिड 19 या विषाणूपासून शरीराचा बचाव करेल. रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीचे डायरेक्टर अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांच्या मते ही लस दोन वर्षापर्यंत शरीराचे रक्षण करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.