सिंधुदुर्ग : जगभरातील कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराने मोठमोठ्या लोकांना आपल्या कवेत घेतले आहे. महाराष्ट्रात याचा प्रभाव वाढत असताना महाविकास आघाडीतील नेते जिंतेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अशा अनेक दिगग्ज नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती.
अशातच आता निलेश राणे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोव्हिड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्बेत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ कॉरंटाईन करून घेतले आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतःची चाचणी करू घ्यावी. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 16, 2020