सोलापूर |
पंढरपूर येथील ऐतिहासिक होळकर वाड्याचे पाडकाम थांबवण्याबाबत धनगर संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले. ही वास्तू अडीचशे वर्षांपूर्वीची पुरातन वास्तू आहे.
निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, ऐतिहासिक वास्तू जतन करणे हे पुरातन विभाग व महाराष्ट्र शासनाचे काम आहे, परंतु वाड्याचे जतन व संवर्धन करणे दूरच आता रस्ता रुंदीकरण या विकासाच्या नावाखाली होळकर वाड्याचा बरासा भाग पाडला जाणार आहे. वाड्यातील पुरातन मारुती मंदिर राम मंदिर यामुळे बाधित होणार आहे पंढरपूर येथील होळकर वाडा ही होळकरशाहीच्या अन्यायाची अस्मिता आहे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर ह्या वाड्याचे विद्रूपीकरण किंवा मोडतोड केली तर अनुयायी थंड बसणार नाहीत. रस्ता रुंदीकरणाची अवजी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करून होळकर वाड्याचे नुकसान थांबवावे व आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी निवेदनाद्वारे धनगर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.