Latest Marathi News

BREAKING NEWS

रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांची भेट घेणार

0

ठाण्यात रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली रोषही शिंदे घ्या सहा महिन्याचा गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे तसेच त्यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे अशातच आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज ठाण्याला जाणार असून रोषही शिंदे यांची भेट घेणार आहे.

ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे जखमी झाल्या असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. दरम्यान रोशनी शिंदे यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं कळतं.

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रश्मी शिंदे यांना सोमवारी (3 एप्रिल) मारहाण झाली होती. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे यांना दुखापत झाली असून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणाची दखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. रोशनी शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह ठाण्याला जाणार आहेत. दुपारी एकच्या सुमारास दोघेही ठाण्यात पोहोचून रोशनी शिंदे यांची भेट घेतील असं समजतं.

Leave A Reply

Your email address will not be published.