Latest Marathi News

BREAKING NEWS

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

0

पुणे : मॉडर्न विकास मंडळाच्या विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त खासगी क्लासेस घेणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आज संपूर्ण जग आपल्याकडे कुशल मनुष्यबळ असलेला देश म्हणून मोठ्या आशेने पाहत आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मनिषा बुटाला, सागर शेडगे, नवनाथ जाधव, मकरंद टिल्लू, प्रज्ञा केसकर, मिताली सावळेकर यांच्या सह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.