Latest Marathi News

BREAKING NEWS

शिक्षक हे उज्जवल भविष्य घडवतात, त्यामुळे त्यांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची जबाबदारी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे : शिक्षक दिनानिमित्त कोथरुड मतदारसंघातील मनपा शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले.. शिक्षक हे उज्जवल भविष्य घडवतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

यावेळी माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा कोथरूड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेविका हर्षाली माथवड, ॲड. मिताली सावळेकर, कुलदीप सावळेकर, सरचिटणीस दिनेश माथवड, दीपक पवार यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.