Latest Marathi News

BREAKING NEWS

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची 27 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार कार्यशाळा

0

डिजिटल मीडियास संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारणी व महाराष्ट्रातील जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांची एक दिवसीय कार्यशाळा पुणे येथे रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली आहे.
राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्य कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्य सचिव नंदकुमार सुतार, राज्य संघटक शामल खैरनार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य सहसचिव संजय कदम, कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण, कोल्हापूर विभाग अध्यक्ष सुहास पाटील, राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य समन्वयक चंद्रकांत भुजबळ, राज्य समन्वयक केतन महामुनी, राज्यसल्लागार मयूर गलांडे, प्रशांत माने, अमित इंगोले, रोहन नलावडे यांची उपस्थिती होती

हेही वाचा :स्वर्गीय पाचर्णे हे जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही होते – चंद्रकांत पाटील

हेही वाचा :“अजित पवार आणि शरद पवारांची मिलीभगत आहे”,राज ठाकरेंच्या या विधानावर अजित पवार संतापले;म्हणाले,”…याचा मक्ता त्यांना कोणी दिला?”

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्वात मोठी एकमेव संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून प्रसार माध्यमातील संपादक पत्रकारांच्या विविध मागण्या या शासनाकडे सादर करण्यात आल्या होत्या यामधील काही मागण्या मान्य करून त्यावर कारवाई देखील सुरू आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना संघटना वाढीसाठी योग्य ती दिशा मिळावी यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी राजामाने यांनी दिली.
या संघटनेने महाबळेश्वर येथे दोन दिवसीय अधिवेशन गतवर्षी आयोजित केले होते या अधिवेशनात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची ही उपस्थिती होती या अधिवेशनात डिजिटल पत्रकारांना श्रमिक पत्रकार कक्षेत सामावून घेण्याची मागणी मांडली गेली होती या मागणीचा विचार करून नुकतेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागणीला तत्वतः मान्यता देण्यात आली होती. राज्यातील डिजिटल माध्यम कर्मचार्‍यांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना नियोजनबद्ध प्रयत्न करत असल्याचे माने यांनी यावेळी सांगितले तसेच या नियोजित कार्यशाळेत सर्व डिजिटल माध्यम कर्मींना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी सदस्य विभागीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.