Latest Marathi News

BREAKING NEWS

स्वर्गीय पाचर्णे हे जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही होते – चंद्रकांत पाटील

0

पुणे: शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. बाबुरावजी पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत यांनी उपस्थिती लावली.

यावेळी पाटील यांनी स्व. पाचर्णे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना स्वर्गीय पाचर्णे हे जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही होते. शिरुर, हवेली आणि परिसरात त्यांनी पक्षाचं जाळं निर्माण करताना कार्यकर्त्यांना ताकद दिली. पक्ष घरोघरी पोहोचवला. त्यांच्या संस्मरणीय योगदानाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवता यावा यासाठी ग्रामीण भागातून राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी एखादे अभ्यास केंद्र उभारावे, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्या सह बाबुराव पाचर्णे यांच्यावर निखळ प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.