Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापूर सभा । अजित पवारांच भाषण सुरु होताच नारिकांनी फिरवली पाठ

0

कोल्हापूर । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेनंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरसभा मैदानात पार पडली या सभेला छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर काल कोल्हापुरात दाखल झाले होते, मात्र या सभेत मी अतीरेकी नाही, मी शेतकरी आहे असा बॅनर झळकावणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अजितदादा महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते रविवारी पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दसरा चौकात निर्धार सभा पार पडली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून ही उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापुरात दाखल झाले यावेळी त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले. यासाठी हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर सभास्थळी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. अगदी कोल्हापूर सह आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक भाषण ऐकण्यासाठी आले.

अजित दादा यांच्या या सभेला मोठी गर्दी देखील झाली. छगन भुजबळमी धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांची भाषण सुरू झाले. आणि शेवटला अजित दादा हे बोलण्यासाठी उभारले मात्र दुपारपासून ताटकळत बसलेले नागरिक हे अजितदादांचे भाषण सुरू असतानाच उठून जाऊ लागले. यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्या झालेल्या पाहायला मिळाल्या. आता या खाली खुर्च्यांची जोरदार चर्चा कोल्हापुरातून थेट मुंबईपर्यंत सुरु झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.