Latest Marathi News

BREAKING NEWS

“काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत मात्र फडणवीसांनी…”, भाजपाच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

0

21 जून 2022 रोजी शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी अजित पवार आणि त्यांच्यासह इतर महत्त्वाच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. आता काँग्रेस पक्षातही फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपचे दिग्गज नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

हेही वाचा :मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ; “कोविड घोटाळा..”

हेही वाचा :पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

भाजपामध्ये येण्यासाठी लांब रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत. मात्र आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नो रूम अॅव्हेलेबल, हाऊस फुल्ल असा बोर्ड लावला आहे असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांशी आमचं बोलणं झालं आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगाव की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही. असं थेट आव्हानच सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.