Latest Marathi News

BREAKING NEWS

पालकमंत्री चंद्रकांत यांच्या हस्ते ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांचा सत्कार

0

पुणे: जागतिक पोलीस अँड फायर गेम्स ही स्पर्धा जागतिक स्तरावर पोलीस दलासाठीची ऑलिम्पिक स्पर्धा मानली जाते. कॅनेडा येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि पुणे पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक पैलवान विजय चौधरी यांनी सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल माजी नगरसेवक सुशील मेंगडे यांच्या माध्यमातून त्यांचा आज पैलवान विजय चौधरी यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पाटील यांनी चौधरी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत शहराध्यक्ष धीरज घाटे, कोथरुड मंडळ अध्यक्ष पुनीत जोशी, वृषाली चौधरी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.