मुंबई । मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित झाल्या आहेत.यावरून जोरदार राजकारण तापले असून ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुका स्थगित करण्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक घ्यायला घाबरत असा आरोप त्यांनी केला. अमित ठाकरे यांनी सुद्धा निवडणूक स्थगितीच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
तर दुसरीकडे सिनेट निवडणूक स्थगितीच्या मुद्यावरुन दोन युवा ठाकरें नेत्यांमध्ये जुंपली आहे. अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. “निवडणुकीवेळी हे लपून बसतात. स्थगिती मिळाल्यावर बिळाच्या बाहेर येतात. निवडणुकीत उतरा ना. तुम्ही कुणाचं नाव घेतलं आता आदित्यचं ना…हं… त्यांच्याविषयीच बोलतो” अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.
राजगड येथे आयोजित पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांना या बद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले की, “मी काही लोकांवर बोलत नाही, त्यांना टिका करु दे. मिंधे-भाजपा गटाची तयारी नाही. कार्यक्रम जाहीर झाल्यावर निवडणुका स्थगित होणं धोकादायक आहे. लोकसभेच्या निवडणुकाही अशाच स्थगित होऊ शकतात. देशात लोकशाही नाही, अशा पद्धतीने वाटचाल सुरु आहे” अशी टीका त्यांनी केली.
मलिक यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेतली का? भाजपा नेते कंबोज म्हणतायत की,
‘उद्धव ठाकरे अद्याप अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत’