Latest Marathi News

BREAKING NEWS

चक्क खतांच्या गोणीवर पंतप्रधान मोदी झळकले; राजू शेट्टी संताप व्यक्त करत म्हणाले की,

0

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच नेहमीच जाहिरातीच्या माध्यमातून झळकत असतात अशातच आता त्यांचा फोटो खतांच्या गोण्यांवर छापण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. खतांचा कमीत- कमी वापर करावा असा संदेश या फोटोद्वारे शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. याबाबत खत कंपन्यांना केंद्र सरकारकडून डिझायन पाठवल्याचेही सांगण्यात येत आहे. या निर्णयावरुन राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे.

याबाबत समीर आलेली माहिती अशी की, मोदी सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या केंद्रीय खत विभागाने शुक्रवारी उत्पादकांना पत्र लिहले आहे. यामध्ये नवीन डिझाइन केलेल्या पिशव्या खरेदी आणि वापरण्यासाठी तातडीने योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे.

या पत्राबरोबरच विभागाने सर्व उत्पादकांसोबत नवीन डिझाइन शेअर केले आहे, ज्याला रसायन आणि खते मंत्र्यांनी अंतिम आणि मंजूरी दिली आहे. मोदी यांच्या फोटोसोबत रासायनिक खतांचा कमी आणि संतुलित वापर करून पृथ्वी मातेला वाचवण्यासाठी मी शेतकऱ्यांनी मोठे पाऊल उचलण्याचे आवाहन करतो,” असा संदेश खतांच्या गोण्यांवर असेल.

यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. “रासायनिक खतांच्या गोण्यांवर फोटो छपाईला आमचा विरोध नाही, पण त्यांना त्याचा काही राजकीय फायदा होणार नाही. त्यांना श्रेय घ्यायचं असेल तर 10 वर्षातील रकाना त्यांनी गोणीवर टाकावा म्हणजे त्यांना सगळं समजेल..” असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

मलिक यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेतली का? भाजपा नेते कंबोज म्हणतायत की,

सिनेट निवडणुकीच्या मुद्द्यावरून दोन्ही युवा ठाकरेंमध्ये जुंपली !

Leave A Reply

Your email address will not be published.