Latest Marathi News

BREAKING NEWS

‘उद्धव ठाकरे अद्याप अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत’

0

उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून आज संजय राऊत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला त्यावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सामना विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गट अन भाजपातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देवेंद्र फडणवीसांवर सामनातून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत बावनकुळेंनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलंय की, “उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत.”, अशी घणाघाती टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

पुढे ठाकरे गटाच्या सेनेचा त्यांनी किंचीत सेना असा उल्लेख केला. “किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात गरळ ओकली आहे. २०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.”, अशी आगपाखड चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीये.

पुणे शहरातील खड्ड्यांवरुन हायकोर्टाने महानगर पालिकेला फटकारले !

एकनाथ शिंदे येत्या सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार

Leave A Reply

Your email address will not be published.