कोल्हापूर दौऱ्यादरम्यान चंद्रकांत पाटलांचा ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमात सहभाग, हुतात्मा स्मारक येथे वीरांच्या स्मृतींना हि केले अभिवादन
कोल्हापूर : आज संपूर्ण भारत देशात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाची सुरूवात करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी, संस्थांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
हेही वाचा >>“राहुल गाधींमध्ये हिंमत असेल तर…”, स्मृती इराणी राहुल गांधींवर आक्रमक
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमात सहभागी होऊन कोल्हापूरमधील हुतात्मा स्मारक येथे वीरांच्या स्मृतींना अभिवादन केले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले.

सर्व कार्यकर्त्यांनी भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसीत देश बनवण्याचे स्वप्न साकारू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगू. भारताची एकता अधिक मजबूत करू, देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान ठेवू. नागरिक म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडू अशी पंचप्रण शपथ घेतली. यावेळी त्यांच्या समवेत कोल्हापुरातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.