Latest Marathi News

BREAKING NEWS

जेष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यासंगी विचारवंत, साहित्यिक गमावला – चंद्रकांत पाटील

0

मुंबई : जेष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके याचे आज वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.

हेही वाचा >>चंद्रकांत पाटलांनी मानले जनतेचे आभार..!

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रा.हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे ते निष्ठावंत पाईक होते. आपल्या लेखणीने बहुजन समाजाचे प्रबोधन करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यासंगी विचारवंत, साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो व नरके कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! ओम शांती! अशा भावना पाटील यांनी आपल्या श्रद्धांजली पर फेसबुक पोस्ट मध्ये व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा >>“पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही, कारण तुम्ही तिथे…!”, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम राहिलं. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांचं विशेष राहिलं. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.