Latest Marathi News

BREAKING NEWS

2024 पर्यंत उजनीचे पाणी कोळेगाव धरणात आणणारचं, तानाजी सावंतांना विश्वास – तानाजी सावंत

0

धाराशिव : धाराशीव जिल्ह्याचा विकास हाच माझा उद्देश अशी गर्जना राज्याचे आरोग्य आणि धाराशीवचे पालकमंत्री तानाजी सांवत यांनी दिली आहे तसेच आवश्यक आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी समजतो असे वक्तव्य त्यांनी केले आहे बुधवारी संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग लाभार्थी योजना आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे परांडा इथं आयोजन कार्यक्रमात ते बोलत होते.

आकरा हजार कोटी रुपये खर्च करुन उजनी धरणातून सात टीएमसी पाणी सीना-कोळेगाव धरणात आणण्याची मंजुरी मिळालेली आहे. जून 2024 पर्यंत कोळेगाव धरणात हे पाणी येणार असल्याचा मला विश्वास असल्याचे सावंत म्हणाले. या पाण्याचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होईल, असा मला विश्वास आहे असे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती दत्ता साळुंके आणि सर्व विभागातील जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यंत्रणांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांच्यासाठी शासनाने आखलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करावेत अशी सूचनाही सावंत यांनी दिल्या.

त्याचप्रमाणे शासनाच्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करावी. प्रत्येक योजनेचा शेवटच्या शेतकऱ्याला लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन तानाजी सावंत यांनी केले. शेतकरी आणि जनतेला केंद्रबिंदू ठेवून काम करावे. झिरो पेंडन्सीचा अवलंब करून सर्व प्रलंबित कामे निकाली काढा अशा सचूना सावंत यांनी यावेळी दिल्या.

कोल्हापूर दौऱ्यादरम्यान चंद्रकांत पाटलांचा ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमात सहभाग, हुतात्मा स्मारक येथे वीरांच्या स्मृतींना हि केले अभिवादन

“राहुल गाधींमध्ये हिंमत असेल तर…”, स्मृती इराणी राहुल गांधींवर आक्रमक

Leave A Reply

Your email address will not be published.