कोविड घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंच्या काळातील आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे.
हेही वाचा >>“दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटू शकतात, यामध्ये…”, उद्धव ठाकरे – राज ठाकरे भेटीबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुलुंड येथे तात्पुरते कोविड सेंटर बांधण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेत्याने १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यानी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली असून याबाबतची तक्रार मुंबई पोलीस, आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ईडी), कंपनी मंत्रालय यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. याबाबत सोमय्या यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली.
मुलुंड रिचार्डसन क्रुडास मैदानावर तात्पुरते कोविड सेंटर बांधण्यात आले होते. उद्धव ठाकरेंचे निकवटर्तीयाशी संबंधित असलेल्या ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड कंपनीला येथे तात्पुरते रुग्णालय बांधण्याचे कंत्राट देण्यात आले असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लि. कंपनी ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. २०१९ पर्यंत काही संगीताचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. त्या कंपनीला मुलुंड व दहिसर येथील कोविड हॉस्पिटल बांधणे आणि भाड्याने देण्याचा अट्टाहास मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने करण्यात आला, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.