Latest Marathi News

BREAKING NEWS

तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्याच्या पहिला टप्प्यातील १०९ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस – पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

0

पुणे: काल जेजुरी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.

हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस – पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्याच्या एकूण ३४९ कोटी रुपयांपैकी पहिला टप्प्यातील १०९ कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत पाटील यांनी श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करुन दर्शन घेतले.

यावेळी आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे तसेच जेजुरी देव संस्थानचे विश्वस्त पोपटराव खोमणे, अॅड.पांडुरंग थोरवे, अॅड.विश्वास पानसे, अनिल सौंदडे, मंगेश घोणे, राजेंद्र खेडेकर, अभिजित देवकाते आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.