Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी दिला प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा?

0

मराठी वृत्तवाहिनी SAAM TV ने दिलेल्या बातमीनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धुळे जिल्ह्यात लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गोटे हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊ शकतात.

हेही वाचा >>भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अॅक्शन! ,ठाकरेंच्या काळातील आणखी एक घोटाळा काढला बाहेर

त्या बातमीत पुढे असेही म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा हा अनिल गोटे यांनी गुरुवारीच पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे. तसेच लवकरच अनिल गोटे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याने, कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

अनिल गोटे हे धुळे शहराचे माजी आमदार आहेत. भाजपमधून राजीनामा देऊन गोटे हे चार वर्षांपूर्वी ते राष्ट्रवादीत आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.