Latest Marathi News

BREAKING NEWS

भारताला विदेशी मैदानावर जिंकायला शिकवणाऱ्या सौरव गांगुलीचा आज ४८ वा वाढदिवस.

0

मुंबई : भारताला विदेशी मैदानावर जिंकायला शिकवणाऱ्या सौरव गांगुलीचा आज ४८ वा वाढदिवस. सौरव गांगुलीला जगभरातील त्याचे फॅन्स ‘दादा’ नावाने बोलवत असले तरी, राजघराण्यात जन्म झाला असल्याने त्यांचे वडील चंडीदास त्यांना ‘महाराजा’ नावाने बोलावत होते. इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटर ‘सर जेफ्री बॉयकॉट यांनी सौरव गांगुलीला प्रिन्स ऑफ कोलकाता हे नाव दिले.

८ जुलै १९७२ रोजी कोलकाता मधील बेहला येथे सौरवचा जन्म चंडीदास आणि निरुपा गांगुली यांच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचा प्रिंटचा व्यवसाय होता. कोलकाताच्या काही बड्या खानदानांमध्ये त्यांची गणना होते. सुरुवातीपासूनच एका गर्भश्रीमंत घरात जन्म घेतलेल्या सौरवल, वडिलांनी कधीही संपत्तीचा गर्व होऊ दिला नाही.

क्रिकेट करिअरची सुरुवात कशी झाली.

सौरवचा मोठा भाऊ स्न्हेहाशीश स्वतः एक क्रिकेटर होता. तो बंगालकडून रणजी क्रिकेट टीममध्ये होता. स्नेहाशीशला कधीही राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांनी आपल्या अनुभवाचा संपूर्ण वापर आपल्या लहान भावासाठी केला. शाळा कॉलेजपासूनच सौरवने आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली होती. कोलकाता शहर फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या मुलाने कोणत्याही खेळात करिअर करावे, या गोष्टीला त्यांच्या आईचा सख्त विरोध होता. किंबहुना वडिलांना देखील क्रिकेट हा खेळ आवडत नव्हता पण आपल्या भावामुळे सौरवच्या क्रिकेट करिअरला सुरुवात झाली.

आक्रमक कॅप्टनसीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सौरव गांगुलीने १९९२ साली वेस्टइंडीज सोबत आपला डेब्यू केला होता. १३ जुलै २००२ ला नेटवेस्ट सिरीज मध्ये इंग्लंडचा पराभव केल्यानंतर लॉर्डसच्या गॅलरीमधून फिरवलेला शर्ट कोणीच विसरू शकणार नाही. २००२ साली एंड्रयू फ्लिंटॉफने वानखेडे मैदानावर इंग्लंडने भारताचा पराभव केल्यानंतर, टी-शर्ट काढून मैदानात धिंगाणा घालता होता. त्याचाच वचपा काढत गांगुलीने लॉर्डसवरती शर्ट काढून फिरवला होता. ही घटना क्रिकेटच्या इतिहासात कायम लक्षात ठेवली जाईल. आपल्या याच आक्रमक खेळामुळे सौरव गांगुलीला दादा म्हणले जाते.

युवराज सिंह, जहीर खान, हरभजन सिंह, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या कित्येक खेळाडूना सौरवने चान्स दिला होता. आणि अशाच नवीन खेळाडूंच्या जीवावर २००३ वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत धडक मारली होती. इतर टीमकडून होणाऱ्या स्लेजिंगला सौरव जशाला तसे उत्तर द्यायचा. आपल्या आक्रमक खेळीने विदेशी मैदानावर भारताला जिंकायला शिकवलं

१९९७ साली सौरव गांगुली डोना गांगुलीसोबत विवाहबद्ध झाला. डोना-सौरव लहानपणापासून एकमेकांना चांगले ओळखत होते. डोना एक प्रोफेशनल डान्सर होती. दोघांना आता एक मुलगी झाली आहे जिचे नाव सना ठेवले आहे.

भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आज बीसीसीआयचा अध्यक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.