भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केल्याने विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. याप्रकरणी विरोधी पक्षांनी गंभीर आरोपही केले आहेत. त्याचाच परिणाम गुरुवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिसून आला. ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांनी सत्ताधारी पक्षाच्या तपास यंत्रणांच्या चौकशीवरून संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच, ‘सगळा हिशोब इथेच होतो’ असंही अनिल परब विधानपरिषदेत म्हणाले.
हेही वाचा :“नितीन देसाईंना अनेकांनी…”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा
हेही वाचा :घराणेशाहीवर केलेल्या भाजपच्या टीकेला सुप्रिया सुळेंचे उत्तर
अनिल परब यांची ईडीकडून चौकशी चालू असताना आपल्या कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचं अनिल परब यावेळी म्हणाले. “जे सोन्याचा चमचा घेऊन राजकारणात आलेत, त्यांचं ठीक आहे. आम्ही रस्त्यावर भांडून, भानगडी करून, आंदोलन करून, पोलिसांचा मार खाऊन इथे आलोय. मला काही हरकत नाही. आम्हाला उचला, टाका आत. पण कुटुंबाला भोगायला लावू नका”, असं अनिल परब म्हणाले.