Latest Marathi News

BREAKING NEWS

पाकिस्तानात जाऊन सिनेमे बनव भूषण कुमार अन्यथा…. मनसेच्या या नेत्याने दिला दम

0

मुंबई : सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यापासून बॉलिवूड मधील वातावरण तापलेलं आहे. सामान्य लोकांचा आणि बॉलिवूड मधील अनेकांचा नेपोटीझम विरोधात सूर उमटत असताना सोनू निगमने नाव न घेता सलमान खान वर खोचक टीका केली होती.

याला भूषण कुमार यांनी प्रत्युत्तर दिले होते, अशातच त्यांनी अतिफ अस्लम चे गाणे आपल्या चॅनल वरून रिलीज केल्याने मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे. भारतामध्ये पाकिस्तानी कलावंतांना बंदी असताना अतिफ अस्लमचा व्हिडिओ तुम्ही कसा टाकता असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे.

इतकाच पाकिस्तानी कलावंतांचा पुळका असेल तर पाकिस्तानात जाऊन सिनेमे बनवा इथे बनवण्याची गरज नाही, आणि तुमचे जरी मोठे कॉन्टॅक्ट असले तरी मी तुमच्या सारख्याना घाबरत नाही असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.

सोनू निगमने आरोप केल्यामुळे त्याला डीवचण्यासाठी मुद्दाम आपला कंपोजर दुबईला पाठवून गाणं रेकॉर्ड करून तुम्ही स्वतःच्या चॅनल वरून त्यांनी रिलीज केलंत असा आरोपही त्यांनी लावला.

दरम्यान हे गाणं जर हटवलं नाही तर मनसे स्टाइल आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. कोरोनाच्या काळात आक्रमक पवित्रा घेण्याची आमची इच्छा नाही त्याला भाग देखील पाडू नये असा इशारा देखील अमेय खोपकर यांनी दिला

Leave A Reply

Your email address will not be published.