Latest Marathi News

BREAKING NEWS

ब्युटी ऑफ गणेशोत्सव, वैरागच्या आयेशा अन भारतीचा असाही उत्सव

0

वैराग |

 

विघ्नहर्ता श्री. गणरायाचे आगमन जल्लोष पुर्ण वातावरणात सर्वत्र झाले आहे. गणेशोत्सव हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण. ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे स्वागत होत असतानाच वैराग येथे अनोख्या पद्धतीने बाप्पाचे स्वागत करण्यात आले,. वैराग येथील ब्यूटी पार्लरचालक आयेशा इम्तियाज पठाण यांनी बाप्पाच्या मुर्तीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे.

#आयेशा यांचा मुस्लिम वेशात बाप्पाचे स्वागत करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये आयेशा मुस्लिम वेशात गणेशाची मुर्ती घेवून येताना दिसत आहेत तर त्यांच्या समवेत भारती अमोल म्हमाणे यांनी पारंपारिक हिंदू वेशभूषेत पूजेचे ताट घेवून चालत असल्याचे दिसत आहेत. जाती – धर्माला बाजुला ठेवत हिंदु – मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश त्या यानिमित्ताने देण्यात आला आहे. आयेशा या प्रोफेशनल ब्युटिशियन आहेत. विविध मेकअप आर्टसाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यातूनच, गणेशोत्सवा निमित्त आयेशा व भारती यांनी आपल्या कलेनं श्रीगणेशाचे केलेले स्वागत कौतूकाचा विषय ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.