Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवारांनी विधानसभेत विजय वडेट्टीवार यांच्या राजकीय कारकीर्दीचे कौतुक केले

0

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सुमारे ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर अजित पवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यानंतर काही आमदारांसह त्यांनी विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून ही भूमिका भरून काढण्यासाठी आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा :स्पर्धा परीक्षांची फी 1000 रुपये का? आमदार रोहित पवारांच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अभिनंदन प्रस्ताव आणण्यात आला. अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. दरम्यान, त्यांनी बारामती शेजारील मतदारसंघात निवडणुकीला उभं राहायचं आपलं धाडस नाही, अशी कबुलीही दिली. तसेच त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या राजकीय कारकीर्दीचं कौतुकही केलं.

हेही वाचा :देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांचा “लवकरच होऊ घातलेले विरोधी…” असा उल्लेख केल्याने विधानसभेत हशा पिकला 

विजय वडेट्टीवार यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, “तुम्ही जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा विदर्भात शिवसेनेचं अस्तित्व नव्हतं. पण तुम्ही चंद्रपूर, चिमूर आणि ब्रम्हपुरी अशा ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. त्यामध्ये तुमच्या वरिष्ठांनीही तुम्हाला मार्गदर्शन केलं. पण तुमचं सगळं काम बघूनच १९९८ साली तुम्हाला विधान परिषदेचं सदस्यपद मिळालं. त्यानंतर आज तुम्ही विधानसभेत विरोधी पक्षनेता झाला आहात. तुमची विधीमंडळातील २५ वर्षांची राजकीय कारकीर्द झाली आहे. पुढेही तुमची कारकीर्द अशीच चालू राहणार आहे. कारण तुम्ही शिवसेनेत असो वा काँग्रेसमध्ये तुम्ही तुमची राजकीय भूमिका सोडली नाही.”असंही अजित पवार म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.