Latest Marathi News

BREAKING NEWS

NCC प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

0

ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांमध्येही मोठा आक्रोश निर्माण झाला आहे.

हेही वाचा :स्पर्धा परीक्षांची फी 1000 रुपये का? आमदार रोहित पवारांच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

जोशी बेडेकर कॉलेजमध्ये बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तीन वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी एकत्र NCC प्रशिक्षण घेतात. या प्रशिक्षणामध्ये लष्कर आणि नौदल या दोन्हींसाठी पूर्व-प्रशिक्षण धडे समाविष्ट आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्या तर त्यांना शिक्षा होते. मात्र, शिक्षेच्या कठोर आणि अमानवीय प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत.

हेही वाचा :अजित पवारांनी विधानसभेत विजय वडेट्टीवार यांच्या राजकीय कारकीर्दीचे कौतुक केले

ठाण्यात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ:

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, असे प्रकार आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, सुचित्रा नाईक यांनी सांगितलं. एनसीसीचे प्रशिक्षक हे सिनियर विद्यार्थीच असतात. ते शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.