Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवार साडेतीन वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री

0

राज्याच्या राजकारणात आज पुन्हा मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत फूट पडली असून, मोठ्या संख्येने आमदार सोबत घेऊन अजित पवार हे फडणवीस- शिंदे सरकारच्या आघाडीत सहभागी झाले आहेत. अजित पवारांनी आज राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मंत्रीपदाची शपथ घेतली.

साडेतीन वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे ते पहिले नेते ठरले आहेत. राज्याच्या राजकारणात अतिशय अनपेक्षित अशी घटना आज घडली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अजित पवार हे नाराज आहेत अशा बातम्या येत होत्या परंतु त्यांनी माध्यमातून कधीही मान्य केले नाही. अजित पवार यांच्याबरोबर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मारामबाबा आत्राम, आदिती तटकरे,अनिल पाटील व संजय बनसोडे यांनी ही मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.