Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ; महाराष्ट्रात राजकीय भूकंप

0

मुंबई |

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.

अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.

जित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली इच्छा नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं असून, आपल्याकडे पक्षांतर्गंत इतर जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी १ जुलैपर्यंत अल्टिमेटमही दिला होता. यानंतर अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.

यांनी घेतली शपथ

अजित पवार

  • छगन भुजबळ
  • दिलीप वळसे पाटील
  • हसन मुश्रिफ
  • धनंजय मुंडे
  • धर्मा आत्रम
  • आदिती सुनील तटकरे
  • संजय बाबुराव बनसोडे
Leave A Reply

Your email address will not be published.