Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवारांची बंडखोरी, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले….

0

मुंबई |

राज्यात पुन्हा एकदा महाभूकंप झाला आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या सत्तास्थापनेला एक वर्षे पूर्ण होताच आता राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत चाळीस आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. आज कोणत्याही क्षणी राजभवनात अजित पवार त्यांच्या नऊ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंदर्भात महत्त्वाचे ट्वीट केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले “मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.” होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.