Latest Marathi News

BREAKING NEWS

चकाचक मुंबई : आता रेल्वे स्थानकावर घाण करणाऱ्यांची खैर नाही

0

मुंबई । मुंबई महानगर पालिकेपाठोपाठ आता रेल्वे प्रशासनाने क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेस्थानक आणि गाड्यांत थुंकणारे, घाण करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी ही नियुक्ती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर क्लीनअप मार्शलची नियुक्ती लोकमान्य टिळक टर्मिनसवर करण्यात येणार आहे.

मुंबई विभागातील रेल्वेस्थानकांवर किंवा धावत्या गाडीत थुंकणाऱ्या आणि कचरा करणाऱ्या प्रवाशांविरोधात अनेकदा तक्रारी रेल्वेकडे आल्या होत्या विरोधात कारवाई करण्यात. याशिवाय ‘थुंकू नका’ अशी उद्‌घोषणा रेल्वे प्रशासनाकडून जागो जागी करण्यात येताच आहे; मात्र थुंकणाऱ्यांची आणि रेल्वे परिसरात कचरा करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.

तसेच प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मध्य रेल्वेने निविदा मागवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या मार्शलमुळे रेल्वे स्थाकाचा परिसर स्वच राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कारवाईसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. ते विशेष भारतीय रेल्वे अधिनियामांतर्गत अधिकृत दंड आकारणार आहेत. त्‍यांची नियुक्‍ती केवळ कारवाईसाठी नाही तर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती आणि रेल्वे प्रवाशांना मदत करण्यासाठी होणार आहे. त्‍यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.